मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राठाेडची मॅनेजर मॉडेल दिशा सॅलियन मर्डर केसमध्ये आदित्य ठाकरे असल्याचा गंभीर आराेप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत बाेलताना केला.आता ठाकरेंचे सरकार नाही. आमचे सरकार आहे. त्यामुळे आता चौकशी होणारच असा इशाराही त्यांनी दिला.

राणे म्हणाले, या प्रकरणात यापूर्वी मी थेट नाव घेतले नव्हते. मात्र, आज थेट नाव घेत आहे. या प्रकरणाची सर्वजण चर्चा करीत आहेत. खासगीत अनेकजण बोलत असून आता या प्रकरणाची चौकशी केल्यास सर्वकाही बाहेर येईल.
उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबाेल करताना राणे म्हणाले, बाळासाहेब शिवसैनिकांना साभाळून घ्यायचे. मात्र उद्धव ठाकरे हे कपटी माणूस असून लबाड लांडगा आहे. शिवसेना सोडल्यावर मला मारण्याची सुपारी छोटा शकील, छोटा राजन टोळीला उद्धव ठाकरेंनी दिली होती.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत ते म्हणाले, झालेला मेळावा हा तमाशाकारांचा तमाशा होता. शिव्या शाप देण्यासाठी मेळावा घेतला हाेता काय? मेळाव्यात काहींना फक्त राणेंवर बोलण्यासाठीच आणले होते. मात्र आम्ही आमच्या नेत्यांबद्दल ऐकून घेणार नाही. उद्या कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला ठाकरे जबाबदार असतील. ठाकरेंना वाकायला पण डॅाक्टर लागतो मग काय तुम्ही काम करणार. ते २० मिनिटं सुद्धा चालू शकत नाहीत. उद्धव ठाकरे हे अपघाताने मुख्यमंत्री झाले होते. त्यांनी इतक्या दिवस मराठी माणसासाठी काय केलं हे झालेल्या दसरा मेळाव्यात सांगायला हवं होत. मात्र सांगायला अस काहीच नाही. ‘शिवतीर्था’वर विरळ माणस उभे केले होती. ठाकरे भाषणाला उभे राहिल्यावर माणस बाहेर जात होते. यावरून त्यांनी आपली काय पात्रता ते समजून घ्यावं.
२०१९ निवडणुकीत नाव आणि फोटो लावून निवडणुक लढवली आणि आता मोदींवर टीका करत आहे. पाकिस्तानात पंतप्रधान गेले म्हणून त्यांच्यावर टीका करत आहे. यांना काय माहित की परराष्ट्र संबंध काय असतात. आपण मुख्यमंत्रीच अपघाताने झाले आहेत. यांचं बेगडी हिंदूत्व आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नातवाचे नाव घेतल्यावरून उध्दव यांच्यावर हल्लाबाेल करताना राणे म्हणाले, दीड वर्षांचा नातू नगरसेवक म्हणायला लाज वाटत नाही का? दीड वर्षांचा असल्याने नगरसेवक हाेऊ शकत नाही पण उद्या झाला ना तर त्याला काही म्हणायचा अधिकार नाही. कारण त्याच्या बापाने आणि आजाेबाने शिवसेना वाढविण्यासाठी मेहनत घेतली आहे. उद्धव ठाकरे आयत्या बिळातील नागोबा आहेत. यांचे सेना वाढीत काय योगदान आहे? हे कधी ‘मातोश्री’ सोडून बाहेर पडलेत का? एकनाथ शिंदे, नारायण राणे यांच्यासारख्यांनी कष्ट केले म्हणून शिवसेना वाढली.
