शिंदेंच्या नातवाबद्दल टिप्पणी खालच्या दर्जाची, उध्दव ठाकरेंनी जाहीरपणे शब्द मागे घ्यावेत, देवेंद्र फडणवीस यांची अपेक्षा

अकाेला :अकाेला : उद्धव ठाकरे यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षांच्या नातवावर केलेली टिप्पणी खालच्या दर्जाची आहे. त्यांनी जाहीरपणे आपले शब्द मागे घेतले पाहिजेत अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

अकाेला येथे पत्रकारांशी बाेलताना फडणवीस म्हणाले, मला एका गाेष्टीचे अतिशय वाइट वाटते. उध्दवजींसारख्या एका नेत्याने एकनाथ शिंदेंच्या नातवाचा उल्लेख करून त्याच्यावर टिप्पणी करणे अतिशय खालच्या दर्जाचे आहे. मला असे वाटते की त्यांनी जाहीरपणे आपले शब्द परत घेतले पाहिजेत.



महाराष्ट्र काेठे चालला आहे?  ज्याचे वय दीड वर्षांचे आहे अशा नातवावर आपण टीकाटिप्पणी करायला लागलाे. ठिक आहे, एक वेळ समजू शकताे की तुमचे आणि त्यांचे पटत नाही. निराशा असेल. परंतु, काही पथ्ये पाळली पाहिजेत. मी यासंदर्भात नाराजी व्यक्त करताे. ज्याप्रकारे एकनाथ शिंदे यांच्या नातवाला त्यांनी बाेलून टार्गेट केले आहे, माझी अपेक्षा आहे की त्यांनी हे शब्द परत घेतले पाहिजते.