डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साडेचारशे फुटाचा पुतळा साकारला जाणार, मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये साडे चारशे फुटाचा भव्य असा यांचा पुतळा साकारला जाणार आहे. स्मारकाचे 50 टक्के पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.


इंदू मिल परिसरात सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, जगातील भव्य दिव्य स्मारक लवकरात लवकर तयार व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे. स्मारका संदर्भात एक समिती तयार आहे. याठिकाणी 70 टक्के हरित पट्टा ठेवला आहे. तासाला 15000 लोक या स्मारकला लोक भेट देऊ शकतात. मार्च 2024 पर्यंत स्मारकाचे काम पूर्णत्वास येईल.