मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामीना विरोधात ईडीच्या वतीने सुधारित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. राऊत यांचा जामीन रद्द करण्यात यावा याकरिता ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

मागील सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी सुधारित याचिका दाखल करण्याचे ईडीला निर्देश दिले होते. या याचिकेवर पुढील सुनावणी 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
संजय राऊतांना ईडीकडून 31 जुलैला अटक करण्यात आली होती. सुरूवातीला राऊतांची ईडी कोठडीत रवानगी करण्यात आली होती. 8 ऑगस्टला पीएमएलए कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर राऊतांची आर्थर रोड कारागृहात रवानगी झाली .7 सप्टेंबरला पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. 9 नोव्हेंबरला संजय राऊतांना जामीन मंजूर झाला. मात्र यावेळी ईडीने उच्च न्यायालयात सुधारित याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले होते.
