लव्ह जिहाद हेच विष आहे, अजित पवारांनी लक्षात घ्यावे

देशात आणि महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायद्यासाठी रविवारी हिंदुत्ववादी संघटनांनी मुंबईतील शिवाजी महाराज पार्क वरती जनआक्रोश मोर्चा काढला होता. यात राज्यभरातील विविध जिल्ह्यातून महिला, तरुण वर्ग मोठ्या संख्येने लोटला होता. यावेळी मुंबई भगवीमय झाली होती. भविष्यात दुसरी श्रद्धा वालकर होऊ देणार नसल्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला होता. मोर्चामध्ये महिलांची संख्या सर्वाधिक होती. या मोर्चात हिंदूंची एकजूट पाहून, हिंदू एकवटलेले पाहून महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जळफळाट झालीये. खरतर हा कुठल्या राजकीय पक्षाचा मोर्चा नव्हता. या मोर्चात हिंदू समाज एकवटला होता. या मोर्चाबद्दल महाविकास आघाडीची मते हे हेटाळणी करणारे आहेत.

या मोर्चाबद्दल मत मांडताना अजित पवार म्हणाले की, “लव्ह जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचे काम सुरु आहे.” ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, “हा काही हिंदू जनआक्रोश मोर्चा नाही तर भाजपची रॅली” असल्याचे मत व्यक्त केले. अर्थात असे विधाने महाविकास आघाडीच्या नेत्याकडून येणे स्वाभाविक आहे. अजित पवार यांना अभ्यासू नेते मानले जाते. ते संजय राऊतांसारखे सकाळी उठून प्रत्येक विषयांवर काहीही बोलणारे नेते नाहीये, मात्र या मोर्चाच्या निमित्ताने त्यांनी व्यक्त केलेली भूमिका ही आश्चर्यजनक अशीच आहे. मुळात अजित पवार हे लव्ह जिहाद या मुद्दावर कधी बोलताना दिसलेले नाहीये. त्यांचा ह्या विषयाची फारशी माहिती नसावी किंवा त्यांना ह्या विषयात फारसा रस नसावा. त्यांचा जिहाद या शब्दाला विरोध असावा, सध्या ते राष्ट्रवादीच्या पुरोगामी भूमिकेत शिरलेले आहे. मागे त्यांनी धर्मवीर मुद्दावरून वाद ओढून घेतला होता.

श्रद्धा वालकरची हत्या कशी झाली, तिच्या शरीराचे पस्तीस तुकडे तिच्या प्रियकरांनी कसे केले. या विषयात अजित पवार यांनी कधी लक्ष्य घातलेले नाही. लव्ह जिहाद म्हणजे काही शब्द प्रयोग आहे असे त्यांना वाटले असावे. मात्र, लव्ह जिहादचा संबंध हिंदू-मुस्लिमातून होणाऱ्या धर्मांतरांशी,त्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीशी त्यांना कल्पना नसावी किंवा मुस्लिम मतासाठी अजित पवार यांना लव्ह जिहादवर बोलायचे नसावे. इतर धर्मातही अशा घटना होत असेल मात्र त्याची तीव्रता एवढी जाणवत नाही. मुस्लिम मुलांनी हिंदू आणि इतर धर्मियांच्या मुलींना प्रेम जाळ्यात अडकून नंतर त्यांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा प्रकरणात हिंदू मुलींची होणारी फसवणूक, छळ पुढे त्यातून होणारे घटस्फोट किंवा काही ठिकाणी नाते टोकाला जाऊन त्यातून होणाऱ्या हत्या देशभरात अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. मग त्याकडे गांभीर्याने पहायचे की नाही.? महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी असे प्रकार घडले आहेत. कदाचित मुस्लिम नाव थेट येत असल्याने राष्ट्रवादीला त्यात स्वारस्य वाटत नसले. तर अजित पवार म्हटल्याप्रमाणे समस्याच नाही असे होऊ शकत नाही.

जबरदस्तीने विवाह करणे,घरगुती छळ, घटस्फोट पुढे त्यातून हत्या अशा घटकांना साह्य करणे हे कायद्यानुसार गुन्ह्याच्या कक्षेत मोडते. त्यावर कारवाई करणारा का कायदा आहे. अनेक राज्यात तो लागू करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे तो विशिष्ठ धर्मापुरता नाहीये. तो सर्वांसाठी लागू होईल, मात्र काही नेत्या आणि पक्षांकडून त्या बदल पूर्वग्रह मानले जातात. हा कायदा करताना तो मुस्लिमांवर अन्याय करणारा आहे, असे वाटण्याचे कारण काय? उत्तरप्रदेश,हरियाणा,कर्नाटक, मध्यप्रदेश ह्या राज्यामध्ये हा कायदा लागू आहे. हा कायदा कोणत्याही एका विशिष्ट्य धर्मासाठी नाहीये. कोणत्याही व्यक्तीचे सक्तीने धर्मांतर होत असेल तर त्यासाठी हा कायदा काम करणार आहे.

श्रद्धा वालकर हिची क्रूरकर्मा आफताब याने दिल्लीत हत्या केली होती. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून विल्हेवाट लावली होती. निधी गुप्ता हिची सुफियान याने हत्या करून तिला चौथ्या मजल्यावरून फिकून दिले होते. चंदीगड मध्ये राहणाऱ्या मोहम्मद शरीफ याने शेजारी राहणाऱ्या हिंदू मुलीची गळा दाबून हत्या केली होती. ह्या सगळ्या वास्तवात घडलेल्या घटना होत्या. अजित पवार म्हणतात जाणीवपूर्वक अशा घटनांना प्रसिद्धी दिली जाते. यातून धार्मिक विद्वेष तयार केला जातो. ही कीड आपल्या दारापर्यंत येऊस्तोवर वाट पाहायची का? त्याला आजच गांभीर्याने घेण्याची गरज आहे. खरतर अजित पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते तसेच विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी अशा संवदेशील आणि समाजाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या विषयावर गांभीर्याने विधान करायला हवे.