पदवीधर मतदार संघाचा निकाल काय? मतमोजणी सुरू

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघासह औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल लागला आहे. या पाचही जागांसाठींच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून येत्या दोन ते तीन तासात या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. पाचही ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे. परंतु, नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नुसतीच चुरशीची नव्हे तर प्रतिष्ठेचीही असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पाचही मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. त्यामुळे विजयाचा गुलाल कोण उधळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात सुरुवातापासूनच चर्चेत राहिल आहे. त्यामुळे येथे सत्यजित तांबे की शुभांगी पाटील कोण विजयी होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी ४९.२८ टक्के मतदान झालं आहे. २ लाख ६२ हजार ६७८ मतदारांपैकी १ लाख २९ हजार ४५६ मतदारांनी मतदान केलं आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपचे रणजित पाटील विरुद्ध मविआचे धीरज लिंगाडे असा सामना होत आहे. अमरावती पदवीधरसाठी अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या पाच जिल्ह्यातून मतदान झाले.अमरावती पदवीधर मतदारसंघात मविआचे धीरज लिंगाडे विरुद्ध भाजपचे रणजित पाटील असा सामना रंगतोय. यासाठी अमरावती, वाशिम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ या पाच जिल्ह्यातून मतदान झालं.