आत्ता कोयता खरेदीसाठी द्यावं लागणार आधार कार्ड ; पुणे पोलिसांचा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगने दहशत मजावली आहे. पुणे पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन करून कोयता गँगची दहशत काय कमी होत नाही. विशेष म्हणजे या कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिक असल्याचे दिसून येत आहे. कोयता गँगवर आळा बसावा तसेच शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी आत्ता पुणे पोलिसांनी नवीन युक्ती आखली आहे. आत्ता या पुढे शहरात कुढेही कोयता घ्यायचा असेल तर त्या संबंधित व्यक्तीला आधारकार्ड द्यावं लागणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.

पुणे शहर आसपासच्या परिसरात सुरुवातीपासूनच संघटीत टोळ्यांची नागरिकांत मोठी दहशत आहे. यावर पुणे पोलिसांनी या टोळ्यांमधील अनेक गुन्हेगारांविरोधात मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. ही कारवाई सुरु असतानाच पुण्यात कोयता गॅंगने दहशत माजवण्यास सुरुवात केली आहे. अल्पवयीन मुलांचा या गॅंगमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश असून त्यांच्यामार्फत अनेक ठिकाणी दहशत माजवली जात आहे. गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई केल्यानंतर आता कोयता गँग पोलिसांसाठी डोकेदुखी ठरली आहे.

कोयता खरेदी केल्यानंतर संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड मिळणार आहे. कोयता खरेदी केल्यानंतर त्याचा शोध घेऊन अगोदरच तपासणी करणार आहे. कोयता खरेदी करण्यामागील कारण काय आहे. त्यामध्ये कुठलाही संशय आल्यास पोलीस थेट कारवाई करणार आहे. खरंतर पुणे शहरापुरताच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरात खरेदी करण्याऐवजी ग्रामीण भागात जाऊन टवाळखोर किंवा गुंड कोयता खरेदी करू शकणार आहे. त्यामुळे शहरात अटी घालण्यात आल्या असल्या तरी धुमाकूळ घालणाऱ्यांना यानिमित्ताने चाप बसेल की नाही याबद्दल शंका आहे.