कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत दुसऱ्या दिवशीही ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. सकाळपासून त्यांनी पुन्हा एकदा चौकशीला सुरुवात केली आहे. हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर आणि पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापसी येथील साखर कारखाना व मुलीच्या घरी ११ जानेवारी रोजी ‘ईडी’ने छापे टाकले होते.
कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडी अधिकाऱ्यांनी धाड टाकल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणी पुन्हा वाढल्याचे दिसत आहे. ईडी चे अधिकारी जिल्हा बँकेत आले आणि सकाळपासूनच कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.या सगळ्या घडामोडी सुरू असताना पुन्हा एकदा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांना चिमटा काढला आहे. तुम्हाला हिशोब तर द्यावाच लागणार असंही ते म्हणाले. त्यामुळे आता मुश्रीफ विरुद्ध किरीट सोमय्या
आता कोल्हापूर जिल्हा बँकांमध्ये ईडीची चौकशी सुरू. अनेक बेनामी खाते, शेतकऱ्यांच्या नावाने बोगस एफडी ची चौकशी होणारच, हसन मुश्रीफजी तुम्हाला हिशोबत तर द्यावा लागणार असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.ईडीने हसन मुश्रीफ यांना ईडीकडून एका महिन्यात दुसऱ्यांदा दणका बसला आहे. त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे ईडीने एका महिन्यात दुसऱ्यांना धाड टाकून चौकशी केली. याआधी त्यांच्या घरावर धाड टाकली होती.
