विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघ निवडणुकीतील पहिला विजय हाती आला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे.आपल्या विजयानंतर बोलताना ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी म्हटलं की, हा विजय सर्व शिक्षकांचा आहे. मला सर्व संघटना आणि पक्षाचा चांगला पाठिंबा असल्याने हा विजय शक्य झाला. शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवणार, असं अश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
राज्यातील पाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. पहिला निकाल कोकणातून आला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील विरुद्ध भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे निवडणूक लढत होती. यात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झाला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना पहिल्या फेरीत त्यांना तब्बल 22 हजार मते मिळाली होती.
बाळाराम पाटील यांनी पराभवानंतर म्हटलं की, निकाल आलाय तो स्वीकारला आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर झाला आहे. पण त्या मुद्द्याकडे न जाता कोकणच्या शिक्षकांनी जो कौल दिला तो मान्य करतो.
