नवीन करप्रणाली समजून न घेतल्याने संभ्रमांचे वातावरण

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल या वर्षीचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात सर्व सामन्याचे आणि मध्यम वर्गीयांचे लक्ष्य कराच्या बाबतीत काय निर्णय होतो त्याकडे होते. बजेट सादर करत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली नवीन कर आकारणी नुसार तुमचे उत्पन्न सात लाखापर्यंत असेल तर तुम्हाला कर लागणार नाही. तरीही माध्यमात वेगवेगळ्या बातम्या दाखवण्यास सुरवात झाली. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होण्यास सुरवात झाली.

काल दिवसभर विविध माध्यमात एक तक्ता दाखवण्यात येत होता. त्यात ० ते ३ लाखापर्यंत उत्पन्न असेल तर कर बसणार नाही.३ ते ६ लाखापर्यंत उप्पन्न असेल ५ टक्के कर बसेल ६ ते ९ लाखापर्यंत उत्पन्न असेल १० टक्के कर बसेल. हा तक्ता दाखवला जात होता. मग लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ लागला. सर्वसामान्य नागरिकांना हे गणित समजणे अवघड झाले. मात्र यात गफलत येथे होते की नवीन कर आकारणी आणि जुनी कर आकारणी या दोन पद्धती आहे, हे समजून कोणी घेतले नाही. जुन्या कर आकारणी मध्ये तुमच्या आधीच्या गुंतवणुकीचा विचार केला जाऊ शकतो.

निर्मला सीतारामन यांनी सांगितले सात लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागला जाणार नाही. ते सर्व करमुक्त उत्पन्न असेल. त्यांनी हे नवीन कर आकारणी (New Tax regime) च्या बाबतीत सांगितले. जुन्या कर पद्धतीत तुमची गुंतवणूक लक्षात घेतली जाते. तर नवीन कर पद्धतीत तुमची गुंतवणूक ध्यानात घेतली जात नाही. यामध्ये सात लाखापेक्षा अधीक तुमचे उत्पन्न असेल तर कर बसेल अशी तरतूद आहे. तुम्हाला स्टँडर्ड डिडक्शन मिळणार नाही. तुमच्या कोणत्याही गुंतवणुकीचा विचार केला जाणार नाही.अशा पद्धतीची करप्रणाली राबवण्यात आली आहे.

तुम्ही नवीन प्रणालीचा पर्याय निवडला आणि तुमची उत्पन्नाची रक्कम सात लाखाच्या पुढे गेली तर नव्या कर प्रणालीत पहिल्या सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही, त्यापुढील तीन लाखांपर्यंत पाच टक्के, सहा ते नऊ लाखांपर्यंत दहा टक्के आणि नऊ ते बारा लाखांपर्यंत पंधरा टक्के तर पंधरा लाख करपात्र उत्पन्नावर तीस टक्के कर आकारणी होईल. खरतर ह्या दोन्ही कर पद्धती समजून समजून घेतल्यावर आपल्याला सर्व बाबी लक्षात येईल, यात सर्व स्पष्ट आहे पण माध्यमात दाखवल्या गेलेल्या काही बातम्यांमुळे लोकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली होती.