एखाद्याचा राजकीय रथ जोमाने पुढे जात असेल तर त्याचे राजकीय विरोधक त्याच्या विरुद्ध सडकून टीकाकरत असतात हे एक समीकरण आहे. त्यामुळे राजकारणात हे नेहमी घडत असतं देशात जेंव्हा काँग्रेसचं सरकार होत तेंव्हा काँग्रेसच्या विजयाचा रथ पुढे जात होता. जवाहरलाल नेहरू , इंदिरा गांधी ,राजीव गांधी , सोनिया गांधी तसेच काँग्रेस पक्षातील इतर अनेक नेते यांच्यावर विरोधीपक्ष नेहमीच टीका करत राहिले राजकारणात अशाप्रकारे टीका सगळेच करतात एक नेता बोला कि दुसरा बोलतोच दुसरा बोला की तिसरा पण बोलतोच.
महाराष्ट्रात देखील उद्धव ठाकरे बोलतात ते बोले की संजय राऊत बोलतात आणि संजय राऊत बोले कि शरद पवार बोलतात शरद पवार बोले कि दिल्लीत केजरीवर बोलतात केजरीवाल बोले कि तेलंगणात चंद्रशेखर राव बोलतात या सगळ्यांचं बोलून झालं कि देशभर फिरत राहुल गांधी बोलतात हे सगळे एकाच व्यक्तीवर बोलतात ती व्यक्ती म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. राजकारणात टीका होतंच असते पण टीका करून सत्ता येत नसते त्यासाठी विरोधी पक्षाला समर्थ असा पर्याय द्यावा लागतो असा पर्याय दिल्याशिवाय सत्तांतर होत नसते. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पासून ते पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पर्यंत काँग्रेसला समर्थ असा पर्याय विरोधीपक्षाला देता आला नाही म्हणून कोणत्याही विरोधीपक्षाचे सक्षम असे सरकार दीर्घकाळासाठी भारतामध्ये आले नाही.
भाजप मधून अटल बिहारी वाजपेयी हे एक पर्याय म्हणून काँग्रेसच्या विरोधात उभे राहिले त्यांनतर दुसरा पर्याय उभा राहिला तो नरेंद्र मोदी यांचा नरेंद्र मोदी यांच्या पर्यायाला देशाने स्वीकारलं व मोदींनी काँग्रेस देशभरातून संपवण्याचे काम केले. परिस्थिती बदलली ज्या काँग्रेस विरोधात कोणता सक्षम पक्ष नव्हता त्याच काँग्रेस मध्ये आता नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सक्षम असा पर्याय नाहीये फक्त काँग्रेसचं नाही तर इतर कोणत्याही पक्षात मोदीं विरोधात सक्षम असा पर्याय नाही. राहुल गांधी यांच्या कडे त्या दृष्टीने बघितले पण त्यांचं नेतृत्व देशाने स्वीकारलं नाही हे अनेक राज्याच्या निवडणुकांमधून समोर आलेल आहे.
ममता बॅनर्जी यांनी देखील मोदींच्या विरोधात सर्व विरोधीपक्षांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात होत्या मात्र त्यांना देखील ते शक्य झालं नाही. महाराष्ट्रातून देखील शरद पवार यांनी यांनी तसे प्रयत्न केले पण ज्यांना स्वतःच्या पक्षाचे ८ च्या वर खासदार निवडून आणता आले नाही त्यांना देखील हे जमलं नाही त्यामुळे या नेत्यांकडे मोदींवर टीका करण्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय नसल्याचे दिसत नाही त्यांना वाटते कि टीका करत फिरल्याने आपले सरकार येईल परंतु टीका करून सरकार येत नसते तर त्यासाठी सक्षम असा पर्याय देणं गरजेचं असतं आणि सध्यातरी देशात कोणताही नेता हा नरेंद्र मोदी यांच्या ताकतीचा नाही त्यामुळे विरोधक त्यांच्यावर टीका करताना दिसतात.
