उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याचे निर्देश दिल्याचं माहिती दि.२ फेब्रुवारी रोजी समोर आलीयं. प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांचे फोन टॅप होण्याची शक्यता लक्षात घेता उद्धव ठाकरेंनी हे आदेश दिल्याचं सांगण्यात येतं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदार, खासदार, उपनेते, नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना ही महत्वाची सूचना केल्याचं सांगितलं जात आहे.
“उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आयफोन वापरण्याच्या लायकीचं ठेवलं आहे का?”, असा सवाल नितेश राणेंनी केला आहे. पुढे ते म्हणाले, “कधी वडापावच्या पेक्षा जास्त दिलं आहे का? स्वत: बिर्याणी आणि लाल मांस शिवाय खात नाही. कोणत्याही रेस्टाँरंटमध्ये गेल्यावर बिल न देता बाहेर येतात. त्यामुळे कार्यकर्त्यांना कोणत्या तोंड्यानं आयफोन वापरण्यास सांगत आहात.” तुमचं खरेच कार्यकर्त्यांवर प्रेम आहे, तर त्यांना आयफोन घेऊन द्या. चोरी-चपाटी करत, भ्रष्टाचाराने पैसा कमवून ठेवला आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना एवढी संपत्ती जमवून ठेवली आहे की, नंदकिशोर चतुर्वेदी भेटतच नाही. दुबई आणि साऊथ आफ्रिकेत हॉटेल असून, तो पैसा कोणत्या कामाचा आहे,” असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.
