विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असे म्हणाले, “आम्हाला आता सरकारवर विश्वास राहिलेला नाही म्हणून पक्षाच्या वतीने प्रत्येक पदाधिकाऱ्याला आय फोन घेण्याच्या सूचना दिले आहेत. यापुढे पक्षाच्या ध्येयधोरणाची चर्चाही आय फोनवर फेस टाइमच्या कॉलिंग करण्यात यावी. सामान्य कॉलवर करण्यात येऊ नये. कोणत्याही स्थितीत फोनची रेकॉर्डिंग व ट्रेकिंग करता येणार नाही याची काळजी आता ठाकरे गट घेत आहे. अंबादास दानवे यांचे हे विधान आणि त्यांच्या या विधानापाठोपाठ त्यांच्याच पक्षातील आलेल्या प्रतिक्रिया या साम्य न आढळणाऱ्या आहेत. परंतु यानंतर सामान्य पदाधिकाऱ्यांना एक प्रश्न भेडसावत आहे. तो म्हणजे आता आय फोन घ्यायला लाखभर रुपये पदरचे खर्च करावे लागतील कारण मातोश्रीवरून किंवा शिवसेना भवनावरून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसाठी आय फोन दिले जातील हे शक्य नाही.
जिथे फक्त घेणे हेच सुरू असतं तिथून काही तरी मिळेल याची अपेक्षा पदाधिकाऱ्यांना करणे योग्य नाही. या सगळ्यापेक्षा एक विषय आणखी महत्त्वाचा आहे तो म्हणजे पक्षाचे 40 आमदार निवडून गेले बारा खासदार गेले. अनेक आजी-माजी नगरसेवक गेले अनेक पदाधिकारी देखील पक्ष सोडून गेले. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद देखील गेले. आता पक्षाचे चिन्ह आणि नाव देखील राहतं की नाही अशी एकंदरीत परिस्थिती असताना ठाकरे गटाला अजून काही जाऊ नये असं वाटतंय आणि त्यावर पर्याय म्हणून ते ऐकून घेऊन त्यावर सगळी चर्चा करायची असा आदेश पदाधिकाऱ्यांना देतायेत हे सगळं विचित्र आहे. हातून सगळे गेल्यानंतर आता ही तयारी करतात याला काही अर्थ नाही.
ठाकरे गटात आता विविध चर्चा चालू आहे ती म्हणजे ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषिकेश खैरे यांची कॉल रेकॉर्डिंग ही रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर पक्षाकडून असा आदेश येतो व आय फोनद्वारे फेस टाईम वर बोलण्याचा सल्ला दिला जातो. तो सल्ला आमलात आणण्यासाठी पक्षातील पदाधिकाऱ्यांना लाखभर रुपये खर्च ही लागणार यापेक्षा वाईट गोष्ट कोणती? ऋषिकेश खैरे यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाला ही जागा आली आहे अशी एकंदरीत चर्चा ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये रंगत आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार महाविकास आघाडीचे सरकार असताना झाला आहे.
यात चुकले ते खैरे यांचे पुत्र पण लाखभर रुपये खर्च पदाधिकाऱ्यांना होणार हेच कारण आहे की उद्धव ठाकरेंना कार्यकर्ते व नेते सोडून जात आहेत आपल्या कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी काहीच केले नाही म्हणून नेते व कार्यकर्ते निघून जात आहेत. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यात कोरोनामुळे सगळे ठप्प झालं आणि उद्धव ठाकरेंनी घोषणा दिली. माझा परिवार माझी जबाबदारी तशीच उद्धव ठाकरेंची जबाबदारी होती. महाराष्ट्र व पक्ष संभाळणे परंतु त्यांनी घोषणेची अंमलबजावणी करत त्यांचा पक्ष न सांभाळता त्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली. त्यामुळेच पक्षातील 40 आमदारांनी त्यांना बाजूला केलं यातच आता पदाधिकाऱ्यांना आय फोन वापरण्यासाठी सक्ती केली आहे. त्याचं खरं कारण म्हणजे पक्षातील नेत्यांच्या मुलांचे जे प्रकरण आहेत ते प्रकरण बाहेर येऊ नयेत म्हणून आय फोनची सक्ती केली आहे आणि याचं खापर सरकारवर फोडलं.
