एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या चाळीस आमदारांनी बंद केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले त्यानंतर आदित्य ठाकरे हे बंड केलेल्या आमदारांना नेहमी बोके-खोके गद्दार अशा उपमा देताना दिसले. येवढे दिवस उलटूनही सत्ता केल्याचा राग आदित्य ठाकरेंचा कमी होताना दिसत नाही. वेगवेगळ्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना ते नेहमी या आमदारांना आव्हान देताना दिसतात. आदित्य ठाकरे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना म्हणाले, मी राजीनामा देतो एकनाथ शिंदे यांनी वरळीतून माझ्यासोबत लढवून दाखवावे. अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटताना आदित्य ठाकरे दिसले.
मुळात आदित्य ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी शिवसेनेने वरळी हा सुरक्षित मतदारसंघ तयार केला होता. 2014 मध्ये या मतदारसंघातून सुनील शिंदे हे विजयी झाले होते तसेच 1990 पासून 2004 पर्यंत सलग चार वेळा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे या मतदारसंघातून निवडून आले होते. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला त्यानंतर सुनील शिंदे यांना राजीनामा देण्यास देखील भाग पाडले बदल्यात त्यांना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली. माजी महापौर किशोरी पेडणेकर या देखील वरळीच्या आहेत. सचिन अहिर यांना शिवसेनेत घेऊन आयत्यावर कोयता घेऊन आदित्य ठाकरे निवडणुकीला सामोरे गेले त्यामुळे आदित्य ठाकरे निवडणूक जिंकणार हे आधी स्पष्ट झाले सचिन अहिर यांच्याविरुद्ध लढण्याची ताकद आदित्य ठाकरे मध्ये नव्हती का? सर्व काही सुरक्षित असल्याची खातर जमा झाल्यानंतरच आदित्य ठाकरे निवडणुकीला सामोरे गेले आणि निवडून आले.
आता या सुरक्षित मतदारसंघातून आपल्या विरोधात उभे राहून दाखवावे असे आव्हान ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देत आहेत. आदित्य ठाकरेंना खरंच हिम्मत दाखवायची असेल तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जाऊन निवडणूक लढवल्यास ते खऱ्या अर्थाने आव्हान दिल्यासारखे होईल. ठाणे हा शिवसेनेचा किल्ला आहे मग आदित्य ठाकरे तिथे जाऊन निवडणुका लढवत नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही माझ्या मतदारसंघात या आणि मला आव्हान द्या याला आव्हान देणे म्हणत नाही. तुमचा बालेकिल्ला ठेवून मी तुम्हाला पराभूत करेल याला आव्हान म्हणतात नवरात्रीच्या काळात उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी ठाण्यातील एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या टेंभी नाक्याला भेट दिली होती. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे आल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते त्यामुळे आदित्य ठाकरेंनी त्यांना तिथेच आव्हान देणे गरजेचे आहे. आदित्य ठाकरे बांद्रात राहतात त्या ठिकाणाहूनही त्यांनी निवडणूक लढवली नाही त्याऐवजी त्यांनी वरळी गाठली. आदित्य ठाकरे यांच्या स्वतःच्या मतदारसंघात दुसऱ्या पक्षाचा आमदार आहे आता मात्र एकनाथ शिंदे यांना ते आव्हान देत आहेत.
आदित्य ठाकरे यांनी स्मृती इराणी यांचा आदर्श घ्यायला हवा कारण अमेठी हा काँग्रेसचा गड असताना तिथे अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता राहिली असताना देखील स्मृती इराणी यांनी थेट गांधी कुटुंबीयांना त्यांच्या गटात जाऊन आव्हान दिले. पहिल्या वेळेस त्यांना विजय आणि गुलकवणी दिली परंतु दुसऱ्या वेळेस त्यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला याला आव्हान म्हणतात. आदित्य ठाकरे जर असं म्हणाले असते की मी राजीनामा देतो आणि तुमच्या मतदारसंघात येऊन लढून दाखवतो तर त्यांचे कौतुक झाले असते. आदित्य ठाकरे हे नेहमी जेष्ठ नेते असल्यासारखे वक्तव्य करत असतात त्यांना ज्या मतदारसंघातून निवडून दिले. तिथे शिवसेनेचा कोणताही कार्यकर्ता सहज निवडून आला असता त्यामुळे आदित्य ठाकरे यांचे हे आव्हान म्हणजे नुसते शब्दांचे बुडबुडे.
