ठाकरे गट-राष्ट्रवादीला ब्राह्मणांचा पुळका

जेव्हा एखादी गोष्ट आपल्या बाजूने वळत नसते तेव्हा एक साधी नीती वापरली जाते ती म्हणजे विरोधकांच्या जवळ ती गोष्ट असू नये त्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायची, त्या गोष्टीबाबत संभ्रम पसरवायचा आणि शंका निर्माण करायची यातून आपला स्वार्थ साधून घ्यायचा याला वजाबाकीच राजकारण म्हणतात. आजकाल राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाला ब्राह्मणांचा पुळक येऊ लागलाय वेगवेगळ्या कृती करू लागले आहेत.

कसबा विधानसभेच्या पोट निवडणुकीत भाजपने मुक्ता टिळक या ब्राह्मण उमेदवाराच्या जागी ब्राह्मण उमेदवार दिला नाही याची चर्चा घडवून आणली जात आहे आणि भाजप ब्राह्मण समाज किंवा मतदार नाराज असल्याची अफवा पसरवली जात आहे. ब्राह्मण मंडळी सातत्याने असा दावा करत आहेत यांच्या पतीला किंवा त्यांच्या मुलाला तिकीट दिलं पाहिजे होते. हीच मंडळी एका विषयात वेगळी भूमिका आणि दुसऱ्या विषयात वेगळी भूमिका घेते तेव्हा पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचा विषय येतो. तेव्हा त्यांना वाटतं की, अशा स्वरूपाची घराणेशाही असू नये मुंडेंचं तिकीट त्यांच्याच लेकीला का? असा प्रश्न ते विचारतात पण टिळकांचे तिकीट मात्र टिळकांच्या मुलाला किंवा पतीला दिले जावे अशी भूमिका मांडतात. अर्थात त्या भूमिका मांडण्या मागचं कारण पंकजा मुंडे यांचा राग व टिळकांचे प्रेम असं नाही तर मालकांनी आपल्याला यासाठी नियुक्त केला आहे त्याच्या प्रती निष्ठा दाखवण्यासाठी मालकाचे भलं करण्यासाठीची ही तरतूद आहे. आमदारकी महिन्यांपेक्षा अधिक काळ उपभोगता येणार नाही आणि भाजप ब्राह्मण समाजाला तिकीट देत नाही याची चर्चा ही ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या कडून केली जात आहे. यात फायदा राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाचा आहे. एखाद्या संघटनेचा नेता उठतो तो वक्तव्य करतो व अशा वक्तव्यावरून एक लक्षात येते की भाजपचा पराभव करण्यासाठी हे सगळं चालू आहे.

भाजपने तिकीट कोणाला द्याव व ब्राह्मण समाजाने कोणाच्या मागे उभे राहायचं हा सर्वस्वी ज्यांचा-त्यांचा प्रश्न आहे. यात कुणाचा व्यक्तिगत प्रश्न नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मनामध्ये ब्राह्मणांन विषयी मनात आकस आहे. ब्राम्हण समाजातील ज्या लोकांना वाटत की राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या नेत्यांना ब्राह्मणाविषयी प्रेम आहे त्यांनी जयंत पाटील, अमोल मिटकरी, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, अजित पवार, आणि शरद पवार आत्ताचे व जुने वक्तव्य ऐकावे आणि बघावे. काँग्रेसच ब्राह्मणांवरचं प्रेम हे पुतना मावशी प्रेम आहे हे यावरून सिद्ध होईल.

आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे हिंदुत्व नाही म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ब्राह्मणाबद्दल एवढे प्रेम कसं येते हा प्रश्न आहे. ठाकरे गटात नव्याने पक्षात आलेल्या उपनेत्या सुषमा अंधारे सातत्याने ब्राह्मणांच्या नेत्यांवर, संतांवर टीका करत असतात. अंधारेंच्या वाक्यांना आठवण ठाकरे गटात प्रेमी ब्राह्मणांवर खर प्रेम आहे का हे तपासाव.

कसब्यात ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली नाही म्हणून भाजप ब्राह्मणांचा मारेकरी झाला असे होत नाही परंतु काही राजकीय लोकांकडून जाणीवपूर्वक असे चित्र निर्माण केलं जात आहे. कोथरूड मध्ये चंद्रकांत पाटील यांना तिकीट दिलं त्यावरही अनेक लोक बोलत आहेत. पुण्यातील काही ब्राह्मण नेते आजारपणामुळे दवाखान्यात आहेत. यात भाजपचा काय दोष? काही राजकीय नेते यावर सुविचार राजकारण करत आहेत. जी ताकद आपल्या मागे उभा राहू शकत नाही ती ताकद भाजपच्या सोबत जाऊ नये म्हणून काही राजकीय पक्षांचा खटाटोप चालू आहे.