काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांच्यावर अज्ञात व्यक्तीचा हल्ला

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोलीत हल्ला झाल्याची माहिती आहे. आमदार प्रज्ञा सातव यांनी स्वतः ट्विट करत आपल्यावर हल्ला झाल्याची माहिती दिली आहे. माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता, असं प्रज्ञा सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

कसबे दवंडा या गावांमध्ये एका व्यक्तीने आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला केला आहे. ही माहिती प्रज्ञा सातव यांनी स्वतः फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट करून दिली आहे. या प्रकरणामध्ये आखाडा बाळापूर पोलिसांनी तत्काळ हल्लाखोराला ताब्यात घेतले होते. त्यानंतर या प्रकरणांमध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्यवर हल्ला करून घरी बसवण्याचा कट असू शकतो. अशी प्रतिक्रिया आमदार प्रज्ञा सातव यांनी दिली.