देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, ठाण्यातील निवासस्थानी जाऊन भेट

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. शिंदे यांच्या ठाण्यातील घरी जात त्यांनी सदिच्छा दिल्यात. यावेळी शिंदे यांनीही फडणवीसांचं स्वागत केलं. वाढदिवसाची सदिच्छा भेट असली तरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटल्याने त्यांच्यात काही राजकीय चर्चा झाल्याचंही कळतंय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज 59 वा वाढदिवस आहे

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, या शुभकामना!, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छ दिल्या.