“प्रणिती शिंदे अंगार बाकी सब भंगार” काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे रोहित पवारांविरुद्ध आंदोलन

आमदार प्रणिती शिंदे एक अंगार है,बाकी सब भंगार है, अशा घोषणाबाजीत सोलापूरमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर आमदार रोहित पवार यांच्या विरोधात आंदोलन केले. सोलापूर लोकसभेची जागा लढविण्याबाबत महाविकास आघाडीची येत्या महिन्या दोन महिन्यात बैठक होईलअसा माझा अंदाज आहे. सोलापूरची जागा काँग्रेसकडेच राहिलं की राष्ट्रवादीने लढवायची हे देखील त्याच बैठकीत ठरेल असे विधान आमदार रोहित पवार यांनी केले होते त्यावरून प्रणिती शिंदे यांनी कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे. काही जणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल असा हल्लाबाेल केला होता.

याच मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे यांच्या विरोधात पोस्टर आंदोलन केले. काँग्रेस पक्षाच्या युवक कार्यकर्त्यांकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयासमोर आमदार प्रणिती शिंदे यांचं बॅनर लावून आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बंद कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी केली. प्रणितीताई आप आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादही झाला. राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला.