बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा चित्रपट “पठान” 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटात शाहरुख सोबतच दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांचीही मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट कलेक्शनच्या बाबतीत नव नवे विक्रम करताना दिसत आहे. 25 जानेवारीला रिलीज झालेल्या पठानने केवळ 21 दिवसांत 498.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर 22व्या दिवशी 500 कोटींच्या क्लब मध्ये सामील झाला.
शाहरुख खानच्या पठानने धमाका केला आहे. पठाननंतर आता शाहरुख खान, ‘डंकी’ आणि ‘जवान’ मध्येही दिसणार आहे. राजकुमार हिरानीचा चित्रपट डंकीमध्ये शाहरुख खानची जोडी तापसी पन्नू सोबत असेल. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 ला चित्रपटगृहांत प्रदर्शित होईल. या दोन्ही चित्रपटांशिवाय, शाहरुख, दग्दर्शक अॅटलीसोबतही जवान या चित्रपटात दिसेल. यातील शाहरुखचा लुक नुकताच लिक झाला असून तो सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. शाहरुखचा जवान, 2 जून 2023 रोजी हिंदीबरोबरच तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.
