धोनीच्या ऐतिहासिक आयपीएल करिअरला ‘या’ दिवशी लागणार ब्रेक?

आयपीएल 16 व्या हंगामाला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या आयपीएलचे वेळापत्रक देखील शुक्रवारी जाहीर करण्यात आले आहे. या हंगामात एकूण 10 संघ सहभागी होणार आहे. हंगामातील पहिला सामना 31 मार्च रोजी गतविजेता गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. तर अंतिम सामना 28 मे रोजी खेळवला जाईल. मात्र, हा हंगाम सुरु होण्याआधी चेन्नई सुपर किंग्स आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. धोनीच्या निवृत्तीची तारीख ठरली आहे. त्यामुळे आता धोनीच्या चाहत्यांमध्ये निराशाचे वातावरण निर्माण होणार आहे.

जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये एमएस धोनी या दिग्गजाचाही समावेश होतो. धोनी आगामी आयपीएल 2023 स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. त्याने त्याच्या शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2019साली खेळला होता. तसेच, त्यानंतर ऑगस्ट 2020मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांतून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून अजूनही खेळतच आहे. 41 वर्षीय धोनीला अनेकदा त्याच्या निवृत्तीविषयी विचारणा केली आहे. मात्र, त्याने कधीच याबाबत वाच्यता केली नाही आणि प्रश्न टाळला.

धोनीचा आयपीएलमधील शेवटचा सामना हा 14 मे रोजी खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे. माहितीनुसार, धोनीची ही शेवटची आयपीएल असणार आहे. तर धोनी आपल्या आयपीएल कारकीर्दीतील शेवटचा सामना हा 14 मे ला खेळणार आहे. अशी माहिती समोर आली आहे.धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 234 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 4 हजार 978 धावा केल्या आहेत. यात 24 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच धोनीने 229 गगनचुंबी सिक्स ठोकले आहेत.धोनी हा आयपीएलमधील यशस्वी कर्णधार आहे. धोनीने आपल्या नेतृत्वात टीमला 4 वेळा चॅम्पियन केलं आहे. धोनीने चेन्नईला 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे.