औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर, उध्दव ठाकरेंची नाैटंकी; पण केंद्राने घेतला ठाेस निर्णय

महाविकास आघाडी सरकार असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याचा प्रस्ताव पाठविला हाेता. मात्र त्यासाठी काेणत्याही प्रकारचा अभ्यास केला नव्हता. शिंदे – फडणवीस सरकारने अभ्यास करून पाठविलेल्या प्रस्तावाला केंद्राने मंजुरी दिल्याने आता नामांतराचा मार्ग माेकळा झाला आहे.  

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचं नाव धाराशिव या नामांतराला केंद्राने हिरवा कंदील दाखवला आहे. यापू्र्वी केंद्र सरकारने या प्रस्तावाबाबत मुंबई उच्च न्यायालयात माहिती दिली होती. उस्मानाबादचं नामांतर करून ‘धाराशिव’ करण्याला काही हरकत नसल्याचे, केंद्र सरकारने याआधीच सूचित केले होते. मात्र औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याची प्रक्रीया अजूनही विचाराधीन आहे, अशी केंद्र सरकारची भूमिका होती. मात्र आज अखेर या दोन्ही नामांतराला सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याचा प्रस्ताव अखेरच्या दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला होता.मात्र ठाकरे सरकार पायऊतार होऊन, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ठाकरे सरकारच्या या नामांतराबाबतचा प्रस्ताव रद्द करून, नव्याने नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. यात औरंगाबादचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्याबाबतचा नव्याने समावेश करण्यात आला होता. आज अखेर शिंदे फडणवीस सरकारच्या या सुधारीत प्रस्तावाला केंद्राकडून मंजुरी देण्यात आली आहे.