संजय राऊतांच्या निष्ठेच्या विष्ठा कधीच झाल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी सामना वृत्तपत्राच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती केल्यानंतर राऊतांनी दोघांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे.रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांवर जोरदार टीका करताना रामदास कदम म्हणाले की, “संजय राऊत मुळात शिवसैनिकच नाहीत हे त्यांनाही माहिती आहे आणि मलाही माहीत आहे. पण उसणे अवसान आणून जणू शिवसेना तेच वाचवत आहेत, असा अविर्भाव दाखवून ते संपूर्ण महाराष्ट्राची आणि देशाची फसवणूक करीत आहेत” असा टोलाही रामदास कदम यांनी लगावला.
संजय राऊत आता तुम्ही थांबा.आता मला जास्त बोलायला लावू नका. मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. संजय राऊत यांना मी आता एवढेच सांगेन की मी काही गोष्टी अजूनही विसरलेलो नाही. तुम्ही उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्याबद्दल काय अश्लील शिवीगाळ केली होती याची आठवण मला आहे असेही रामदास कदम यांनी म्हटले. मी इतके दिवस गप्प होतो पण आता डोक्यावरून पाणी जाऊ लागले आहे. त्यामुळे आता आपण थांबणार नाही संजय राऊत यांनी आता ‘बाप दाखवावा नाहीतर श्राद्ध घालावे’ असा इशारा रामदास कदम यांनी दिला.
