कोर्लईतील 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्याअडचणी वाढणार; ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून तक्रार दाखल

कोर्लईतील 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सरकारी रेकॉर्डमध्ये खाडोखोड करुन फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुरुडच्या ग्रामविकास अधिकारी संगिता भांगरे यांनी रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.कोर्लईतील 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणी ग्रामविकास अधिकारी, बीडीओवर रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एफआयआर क्रमांक 26, IPC Sections 420, 465, 466, 468 आणि 34 नुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्यांची चौकशी केली जाईल. तसेच हे मुळ १९ बंगले कोणाचे आहेत. याचा ठाकरेंशी संबंध आहे का याचा शोध घेतला जाईल. सोमय्या यांनी या बंगल्याशी उद्धव ठाकरेंशी संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. यादरम्यान ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या चौकशीतून काही माहिती समोर आली तर ठाकरे कुटुंबाकडून देखील माहिती घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जातील. रायगड जिल्ह्यातील कोर्लईत उद्धव ठाकरे यांनी संपत्ती घेतली आहे. या संपत्तीचा हिशोब ठाकरे कुटुंबाला द्यावा लागेल, याचा पुनरुच्चार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.