माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात खाजगी रुग्णालयात निधन झाले. शेखावत यांना १९७२ मध्ये मुंबई विद्यापीठातून पीएचडी पदवी प्राप्त केली होती. रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आहे.७ जुलै १९६५ रोजी प्रतिभा पाटील यांच्याशी त्यांचे लग्न झाले. प्रतिभा पाटील या राष्ट्रपती होण्यापूर्वी ते त्यांच्या विद्या भारती शिक्षण संस्था फाउंडेशनद्वारे संचालित महाविद्यालयाचे प्राचार्य होते. अमरावतीचे महापौरपदही त्यांनी भूषविले होते.१९८५-१९९० या कालावधीसाठी अमरावती मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले होते. त्यांच्या मागे पत्नी प्रतिभा पाटील, मुलगा रावसाहेब शेखावत, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
