चित्रपट किंवा वेबसिरीज येणार असेल की प्रमाेशनसाठी अभिनेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये सुरू हाेतात. असेच वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केले आहे. मुघल साम्राज्य इतके वाईट हाेते तर त्याला विराेध करणारे त्यांनी बांधलेली स्मारके का पाडत नाहीत? त्यांनी जे काही केले ते वाईट असेल तर ताजमहाल, लाल किल्ला आणि कुतुबमिनारही पाडा, असे म्हणत शाह मुघलांची बाजू घेत बरळले आहेत.
ताज- डिव्हाइन बाय ब्लड या वेबसिरीजमध्ये शाह हे अकबराची भूमिका करत आहेत. यानिमित्ताने बाेलताना ते म्हणाले खरे तर मुघल लाेक इथे लुटायला आले नव्हते. या देशाला ते आपले घर बनवण्यासाठी आले आणि त्यांनी तेच केले. मुघलांचे याेगदान काेण नाकारू शकेल? काही मुघल आक्रमक हाेते याचा अर्थ असा नाही की आपण त्या सर्वांना खलनायक बनवायला हवे.आपल्या स्वदेशी परंपरांवर मुघलांनी घाला घातला. कदाचित ते खरे असेल. पण त्यांना खलनायक करण्याची गरज नाही. लाल किल्ल्याला आपण पवित्र का मानताे? ताे तर मुघलांनी बांधला हाेता. आपल्याला त्याचा गाैरव करण्याची गरज नाही आणि खरे तर त्याची बदनामी करण्याचीही गरज नाही.शाह म्हणाले ज्या लाेकांना माझ्या विचारांना विराेध करण्याची सवय आहे त्यांना माझे म्हणणे कधीही समजणार नाही. आपल्या देशात जे काही वाइट झाले ते मुघलांमुळे झाले असे म्हटले जाते. खरे तर हे खूप हास्यास्पद आहे म्हणजे लाेक अकबर आणि नादिरशाह किंवा बाबरचे पणजाेबा तैमूर यांच्यातील फरक सांगू शकत नाहीत.
