मुंबई : मनसे हा त्यांच्या वाटेला जाण्याएवढा मोठा पक्ष नाही. त्यांच्या वाटेला कुणीच गेलेले नाही, हे सरकार केवळ ईडी, सीबीआय आणि खोक्याच्या साथीने पडले हे सर्वांना माहिती आहे, राज ठाकरेंना जर हे समजत नसेल तर त्यांच्या पक्षाची व्यवस्थित वाढ होणे गरजेचे आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.राज ठाकरेंना ईडी काय हे आम्ही सांगायची गरज नाही, त्यांना चांगला अनुभव घेतला असा टोलाही त्यांनी लगावला.
राऊत म्हणाले की, आम्ही अनुभव घेऊन पक्षाचे काम सुरू आहे. आम्ही महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदूत्व हे कधीच सोडले नाही, या विषयावर कधीच आम्ही भूमिका सोडली नाही. शेतकऱ्यांना खते खरेदी करण्यासाठी जात दाखवावी लागतेय, महाराष्ट्र हे पुरोगामी राष्ट्र आहे, केंद्र आणि राज्य सरकारकडून जात आणि धर्म यावर राजकारण सुरू केले आहे. प्रत्येक ठिकाणी राज्य सरकारकडून जात दाखवा म्हणत असेल तर महाराष्ट्रातील जनतेला धर्म काय आहे हे दाखवावा लागेल.
कसब्याच्या निकालातून मतदार कुठे गेला हे दिसले, नेत्याचे काय घेऊन बसलात असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावत राऊत म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढवून भाजपला पराभूत करण्याचा आम्ही निर्धार केला आहे. काल मविआच्या बैठकीत आम्ही चिंचवडला आमच्यात झालेल्या बंडखोरीमुळे निसटता विजय मिळाला असा टोलाही त्यांनी बावनकुळे यांना लगावला.
