अर्थसंकल्प कसाय, एकदम ओके…विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांचा टोला

ठाणे : राज्याचा अर्थसंकल्प कसाय, एकदम ओके म्हणत अर्थ संकल्पातून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. ठाण्यात शिवजयंती कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, लोक फक्त बोलतात. आपण करुन दाखवतो. सर्वांचा विचार सरकारने केला आहे. कारण हे गोरगरीबांचे, सर्व सामान्यांचे सरकार आहे. तुमच्या ठाण्याचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय त्यामुळे ठाण्यासोबतच महाराष्ट्राचा विकास हाच आपला ध्यास आहे.

अर्थ संकल्पातून विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करुन टाकला आहे. सभागृहात सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे होते.काही लोकं म्हणाले गाजर हलवा आहे. आम्ही तर गाजर हलवा तरी दिला त्यांनी तर फक्त गाजरं दिली होती, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.