संजय राऊत यांनी केलेली शिवीगाळ त्यांची संस्कृती दाखवते – किरीट सोमय्या

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी मात्र किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांनी दिलेल्या शिव्या सांगत पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर किरीट सोमय्या म्हणाले त्यांची पीडा समजून घेतली पाहिजे. संजय राऊत यांनी केलेली शिवीगाळ त्यांची संस्कृती दाखवते. तशी संस्कृती आमची नाही. आणि उद्धव ठाकरे मला तोतऱ्या म्हणतात. पण या तोतऱ्याने तुमच्या बायकोचे एकोणीस बंगले कुठे गायब केले ते द्या. या तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान आहे. मी उद्धव ठाकरे यांना खुलं चॅलेंज करतोय, ज्या शिव्या द्यायच्या आहे त्या द्या पण एकोणीस बंगले कुठे गायब केले ते सांगा ना? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी गंभीर आरोप केले होते. त्यावरून संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. त्यामध्ये संजय राऊत यांना काही दिवस ईडीच्या कोठवडीत देखील राहावे लागले आहे. त्यावरून त्यांची पीडा समजून घेतली पाहिजे असं म्हणत सोमय्या यांनी कोपरखळी लागावली आहे.संजय राऊत यांनी दिलेल्या शिव्यांचा उच्चार किरीट सोमय्या यांनी भर पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामध्ये भडवा, xतिया, भxवा, पोपटलाल असं म्हंटलं आहे. त्यावरून त्यांची संस्कृती दिसते आहे असं म्हणत पलटवार केला आहे.