बाळासाहेबांच्या मुलाला आणि नातवाला राष्ट्रवादीकडे गहाण टाकले. बाळासाहेबांचे विचार विकले, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे.
खासदार संजय राऊत सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील आमदारांना टार्गेट करत आहेत. गद्दार अशी उपमा देत आहेत त्यावर प्रतिहल्ला चढवताना नरेश म्हस्के म्हणाले, शिवसेना पक्ष तुम्ही राष्ट्रवादीला विकला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोराच्या तावडीतून बाळासाहेबांचे विचार धनुष्यबाण आणि शिवसेना सोडून घेतलेली आहे. चोराच्या उलट्या बोंबा ही जी म्हण आहे ना ती सत्य आहे हे तुमच्याकडे बघितल्यावर कळते.
