मला राजकारणाबाबत विचारा, परिणीतीबाबत नाही – खासदार राघव चढ्ढा

बॉलिवूडमध्ये कायम सेलिब्रिटींच्या नात्याची चर्चा रंगलेली असते. आता अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्या खासगी आयुष्याबद्द अनेक चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून परिणीती खासदार राघव चड्ढा यांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे फोटो समोर आल्यानंतर दोघांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. पण रंगणाऱ्या चर्चांवर अद्याप राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी कोणत्याही प्रकारची भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे दोघे खरंच डेट करत आहेत का? असा प्रश्न चाहत्यांच्या आणि अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.

डेटिंगच्या चर्चेबाबत विचारण्यात आल्यानंतर आपचे नेते राघव चढ्ढा यांनी सांगितलं, ‘मला राजकारणाबाबत विचारा, परिणीतीबाबत नाही.’ पुढे राघव यांना प्रश्न विचारण्यात आला की, जे लोक तुमच्या रिलेशनशिपबाबत विचारत आहेत, त्यांना काय सांगाल?’ यावर ते म्हणाले, ‘त्यांनाही लवकरच उत्तर मिळेल.’ राघव यांच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. परिणीती सोशल मीडियावर देखील फार सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.