केंद्रातील मोदी सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ करण्याबरोबर सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना खुशखबरही दिली आहे. देशात करोडो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी जाहीर केली आहे. अशा प्रकारे या योजनेच्या कोटीहून अधिक लाभार्थ्यांसाठी अनुदानाचा कालावधी आणखी एक वर्षाने वाढवण्यात आला आहे.
केंद्र सरकारने एलपीजी गॅसवर सबसिडी जाहीर केली आहे. उज्ज्वला योजना लाभार्थ्यांच्या एलपीजी सिलिंडर सबसिडीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारने प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये सबसिडी एक वर्षासाठी वाढवली आहे. हे अनुदान 14.2 किलोच्या 12 एलपीजी सिलेंडरवर देण्यात येईल. नव्या आर्थिक वर्षात ही सबसिडी लागू असेल. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी एलपीजी सिलेंडर स्वस्त होणार आहे.
केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की, सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये सबसिडी एका वर्षासाठी वाढवली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम उत्पादनांच्या वाढलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे. अशा स्थितीत या उपक्रमाचा लाभ ९.६ कोटी कुटुंबांना आणखी एका वर्षासाठी घेता येईल. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे 1.6 कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे.
