मुंबई : राजकीय गदाराेळातही विराेधकांना कधी चुचकारून तर कधी थेट अंगावर घेऊन मुत्सदेगिरीने सभागृह चालविल्याने यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विक्रमी कामकाज झाले आहे. दाेन्ही सभागृहांत 17 विधेयके मंजूर झाली.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या ऐतिहासिक अर्थसंकल्पानंतर विराेधकांना टीका करण्यासारखे काही नव्हते. अवकाळी पाऊस विराेधकांच्या मदतील धावून आला. सभागृहांत काही दिवस विराेधकांची भूमिका बजावण्यासाठी नुकसान भरपाईसारखे विषय काढले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करू नका असा इशारा दिल्यावर हा विषयही थांबला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज सुरळीत झाले.
या अधिवेशनात मंजूर झालेली विधेयके पुढीलप्रमाणे :
*महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधीकरण विधेयक, 2023. (वैद्यकीय शिक्षण विभाग).
* मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2023 (नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत) (नगर विकास विभाग)
* महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, 2023 (शिक्षेच्या तरतूदीमध्ये बदल करणेबाबत) (ग्राम विकास विभाग)
* महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण विधेयक, 2023 (सामान्य प्रशासन विभाग)
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2023 (विद्यापीठांचे कुलगुरू नियक्ती करण्याच्या व प्र. कुलगुरूची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता सुधारणा करणे) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
*महाराष्ट्र कामगार कायदे (सुधारणा) विधेयक, 2022 (शिक्षेच्या तरतूदीमध्ये बदल करणेबाबत) (उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग)
*महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक, 2023. (वित्त विभाग)
*महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोक-या यांवरील कर (सुधारणा) विधेयक, 2023. (वित्त विभाग)
*पंढरपूर मंदिरे (सुधारणा) विधेयक, 2023 (विधि व न्याय विभाग)
*महाराष्ट्र विनियोजन विधेयक, 2023 (वित्त विभाग)
* महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क नियमन) (सुधारणा)
* महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना (सुधारणा) विधेयक, 2023 (विविध कलमांमध्ये सुधारणा करण्याबाबत) (नगर विकास विभाग)
* महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (सुधारणा) विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
* महाराष्ट्र गोसेवा आयोग विधेयक, 2023
* महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) विधेयक, 2023. (विशेष पोलीस आयुक्त या पदाच्या संदर्भाचा समावेश करण्यासाठी वैधानिक तरतुद करणे) (गृह विभाग)
* महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2023 (कोविड-19 वैश्विक साथरोग राहिलेला नसल्याने त्या अनुषंगाने कलम 73 मध्ये केलेली सुधारणा वगळणेबाबत.) (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग)
