देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्रीपदाच्या काळात डान्स बारवर कारवायात दुपटीने वाढ

मुंबई : मुंबईतील बारवाल्यांकडून महिन्याला शंभर काेटी रुपयांचा हप्ता वसुलीची तयारी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू हाेती. यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कारागृहाची हवाही खावी लागली हाेती. देवेंद्र फडणवीस यांनी बारमधील हप्त्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी कठाेर पावले उचलली. त्यांच्या गृहमंत्रीपदाच्या काळात डान्स बारवर झालेल्या कारवायांमध्ये दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईची माहिती विधानसभेत दिली.  

2021 मध्ये 138  डान्सबारवर कारवाई करण्यात आली हाेती. राज्यात सत्तांतर हाेऊन 30 जून राेजी शिंदे- फडणवीस सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर डान्सबारवरील कारवायांमध्ये लक्षणीय वाढ झाली.  281 डान्सबारवर कारवाई करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार राज्यात 2022 मध्ये 13,647 गुन्हे नाेंदविले गेले.  5329 कोटी रुपयांचे अहमली पदार्थ जप्त करण्यात आले. वाळूमाफियांचा उच्छाद फडणवीस यांनी संपवून टाकला.  अवैध वाळू उपसा  प्रकरणात  3354 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 93 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दारूबंदीसाठीही प्रयत्न केले जात आहेत. राज्यात  दारुबंदी साठी 94,288 केसेस करण्यात आल्या. 78 कोटींचा माल जप्त झाला. सुमारे 30,085 जुगाऱ्यांना खटले दाखल करण्यात आले असून 46 कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे. अवैध  हुक्कापार्लरवर छापे टाकण्यात आले आहेत. 268 हुक्कापार्लर कारवाई करून 1127 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.