ॲड.गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षांकरिता वकीलीची सनद रद्द

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनता कर्मचाऱ्यांची बाजू मांडणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का बसला आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदावर्तेंची वकीलीची सनद दोव वर्षांसाठी रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. याप्ररकणी अॅड. सुशील मंचरकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली.

याच सोबत काळा कोट परिधान करुन त्यांनी हाताला पट्टी बांधून आंदोलनात सहभाग घेतला होता. हे वकिली पेश्याला साजेसं नसल्याचं याचिकाकर्त्याने म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मराठा आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन या दरम्यान माध्यमांसमोर चुकीची वक्तव्यही केल्याचं या याचिकेत म्हटलं आहे.अशा कृत्यामुळे समस्त वकिलांची प्रतिमा मलिन होते. यामुळे सदावर्ते यांच्या विरोधात वकील सुशील मंचरकर यांनी शिस्त पालन याचिका तक्रार केली होती.

गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान मीडिया समोर चुकीची वक्तव्य केल्याचा दावा करत बार कौन्सिलकडे तक्रार करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने देखील सदावर्ते यांच्या विरोधातील शिस्तभंगाची कारवाई थांबवण्यास नकार दिला होता.