भगतसिंह कोश्यारींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, महापुरुषांचा अनादर करण्याचा हेतू नव्हता; हायकोर्टाची टिप्पणी

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा मिळाला आहे. महापुरुषांचा अनादर करण्याचा हेतू कोश्यारी यांचा नव्हता, अशी टिप्पणी मुंबई हाय कोर्टाने केली आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. रमा कटारनवरे यांनी अॅड. अमित कटारनवरे यांच्यामार्फत ही याचिका केली होती.

राज्यपालांची वक्तव्य ही इतिहासाच्या विश्लेषणात्मक आहेत. ही वक्तव्य राज्यपालांचा सामाजिक दृष्टीकोन दाखवतात. श्रोत्यांनीही समाजाभीमूख दृष्टीकोन आत्मसात करत तो आचरणातही आणावा हाच त्या वक्तव्यांमागचा उद्देश होता. त्यामुळे ही वक्तव्य प्रथमदर्शनी कोणत्याही महापुरुषाचा अवमान करणारी नाहीत. म्हणूनच ही फौजदारी कायद्यानुसार, दखल घेण्यास पात्र ठरत नाहीत, असंही निरीक्षण हायकोर्टानं आपल्या आदेशात नोंदवत ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे ही वक्तव्य प्रथमदर्शनी कोणत्याही महापुरुषाचा अवमान करणारी नाहीत. म्हणूनच ही फौजदारी कायद्यानुसार, दखल घेण्यास पात्र ठरत नाहीत, असंही निरीक्षण हायकोर्टानं आपल्या आदेशात नोंदवलं आहे.