कॅगच्या अहवालात उघड झालेल्या भ्रष्टाचाराची एस्आयटी मार्फत चौकशी करा – आशिष शेलार

मुंबई महापालिकेच्या कामांची कॅगने केलेल्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून ८,४८५ कोटींचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. त्यामुळे या मागचा सूत्रधार कोण हे उघड होणे आवश्यक आहे.त्यासाठी या सर्व कामांची फौजदारी कलमांतर्गत एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी,” अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

पालिकेच्या ९ विभागातील ७६ कामांमधील १२ हजार कोटींच्या घोटाळयावर कॅगने ताशेरे मारले आहेत. ज्या मुंबई महापालिकेचे नेतृत्व उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करीत होते त्याचे वर्णन करायचे तर कट, कमिशन आणि कसाई असे करता येईल. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकला, असा थेट आरोप अॅड शेलार यांनी केला आहे.

कॅगचा अहवाल हा केवळ २८ नोव्हेंबर २०१९ ते ३१ आक्टोबर २०२२ या कालावधीतील असून यामध्ये कोविडची कामे नाहीत. केवळ ७६ कामांमध्ये ८४८५ कोटींचा हा घोटाळा उघड झाला असून, या प्रकरणी फौजदारी दंड संहिता अंतगर्त एसआयटी स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, आमदार ॲड शेलार यांनी केली आहे.