सावरकर मुद्यावर मतभेदच, शिवसेनाच आली होती प्रस्ताव घेऊन – अशोक चव्हाण

सावरकर मुद्द्यावर शिवसेनेशी मतभेद होते आणि आहेतच. पण महाराष्ट्रात सरकार बनवण्यासाठी शिवसेनच काँग्रेसकडे प्रस्ताव घेऊन आलो होतो. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी करून सरकार बनवले, असे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहे.

हैदराबाद येथे पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचा नैसर्गिक मित्र पक्ष पक्ष आहे. परंतु ज्यावेळी 2019 मध्ये महाराष्ट्रात विशिष्ट परिस्थिती उद्भवली, त्यावेळी शिवसेनेनेच काँग्रेसकडे सरकार बनवण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. काही मुद्द्यांवर शिवसेनेची आमचे मतभेद होते आणि आहेत. त्यापैकी सावरकरांचा मुद्दा देखील मतभेदाचा राहिला आहे. पण त्यावेळी तो मुद्दा तेवढा पुढे आलेला नव्हता. त्यामुळे आम्ही शिवसेनेचा प्रस्ताव स्वीकारला आणि सरकारमध्ये काँग्रेस सामील झाली. पण सावरकर मुद्द्यावर शिवसेना आणि काँग्रेस यांचे मतभेद आजही कायम आहेत.उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेत सावरकरांचा अपमान करू नका. तो सहन करणार नाही, असा इशारा राहुल गांधींना दिला होता. मात्र अशोक चव्हाण यांनी या मुद्यावर मतभेद कायम असल्याचे सांगून उद्धव ठाकरेंचा इशारा गांभीर्याने घेत नसल्याचे दाखवून दिले आहे.