राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे . काही दिवस छगन भुजबळ घरीच विश्रांती घेणार आहेत. 27 मार्च, सोमवारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना तातडीने येवला येथून नाशिकला उपचारासाठी हलवण्यात आले होते. छगन भुजबळ यांच्या रक्ताचे नमुने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर रक्त तपासणीचा अहवाल समोर आल्यानंतर भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

छगन भुजबळ हे काल नाशिकहून येवला येथे शहीद जवान अजित शेळके यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले होते. जवान शेळके यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ते येवला येथील निवासस्थानी गेल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर ते येवल्याहून नाशिकमध्ये परतले. थंडी, ताप असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तपासणी केली असता कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पुढचे काही दिवस घरीच विश्रांती घेणार असल्याचे समजते आहे.