पुणे – मुंबई एक्स्प्रेस वेवरून १ एप्रिलपासून टोल महागणार

पुणे – मुंबई एक्स्प्रेस वे वरील टोल एक एप्रिलपासून महागणार आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना १८ टक्के अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. या अगोदर म्हणजे १ एप्रिल २०२० रोजी टोल वाढ करण्यात आली होती. दर तीन वर्षांनी टोल वाढीबाबत अधिसूचना काढण्यात येते.

या प्रमाणे वाढणार दर

वाहन. आताचे दर. १ एप्रिलपासून होणारी वाढ
चारचाकी. २७०. ३२०
टेम्पो. ४२०. ४९५
ट्रक. ५८०. ६८५
बस. ७९७. ९४०
थ्री एक्सेल. १३८०. १६३०
एम एक्सेल. १८३५. २१६५