मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरात रामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत गोंधळ झाला. शोभायात्रेदरम्यान दोन गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत 25 जणांना अटक केली आहे. दरम्यान, सध्या मालवणीमधील परिस्थिती नियंत्रणात असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
रामनवमीनिमित्त मालाडमधील मालवणी परिसरात रामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेत गोंधळ उडाला होता. शोभायात्रेदरम्यान दोन गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि त्याचवेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. सध्या मालवणी परिसरात तणावाचं वातावरण असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवणी येथे गुरूवारी दोन गटात राडा झाला होता. त्यानंतर दगडफेकही झाली होती. याप्रकरणी पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला होता. तसेच, याप्रकरणी ताब्यात घेतलेल्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 353, 354, 332, 143, 147, 149 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
