जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा देशात सर्वाधिक वाटा, 22 हजार 695 कोटी जीएसटी जमा

देशात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी कलेक्शनने विक्रम केला आहे. मार्च 2023 मध्ये   1 लाख 60 हजार 122 कोटी रुपये इतके जीएसटी संकलन देशात झाले आहे. यामध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे.  महाराष्ट्रातून 22 हजार 695 कोटी जीएसटी जमा करण्यात आला.

देशात जीएसटी संकलनात महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा खूपच पुढे आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या  गुजरातमधून 9919 कोटी तर  तिसऱ्या स्थानावरील तामिळनाडूमधून 9245 कोटींचा जीएसटी जमा झाला. देशात  एप्रिल 2022 नंतरचे दुसरे सर्वोच्च जीएसटी संकलन  आहे. देशात सलग 14 महिने जीएसटी संकलन हे 1.4 लाख कोटी रुपयांच्यावर राहिले आहे.जीएसटी लागू झाल्यापासून, जीएसटी संकलन 1.6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची ही दुसरी वेळ आहे. मागील वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेच यंदाच्या वर्षी जीएसटी महसुलात 13 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण 18.10 लाख कोटी रुपये जीएसटी कर जमा करण्यात आला. दर महिन्याला सरासरी 1.51 लाख कोटींचा महसूल जमा करण्यात आला. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मागील वर्ष 2021-22 च्या तुलनेत 22 टक्के अधिक जीएसटी जमा झाला. मार्च 2023 मध्ये एकत्रित GST महसूल 1, लाख 60 हजार 122 कोटी आहे. यामध्ये सीजीएसटी 29 हजार 546 कोटी, SGST 37 हजार 314 कोटी, IGSTहा 82  हजार 907 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 42 हजार 503 कोटींसह) 10 हजार 355 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 960 कोटींसह) असे प्रमाण आहे.