छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी खोडा घातल्याचा प्रकार घडला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात बोलत असताना चव्हाण यांनी डॉ कराड यांना अक्षरशः अडवले.
14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ.भागवत कराड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रातील मोदी सरकार कशा पद्धतीने योजनांमार्फत गरिबांना मदत करत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचत आहे असे सांगत होते.यावेळी आमदार सतीश चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री कराड यांच्या चालू भाषणात खोडा घातला. हा जयंतीचा कार्यक्रम आहे. इथे काही प्रचार सुरु नाही, असे म्हणत कराड यांना थांबवले. टाळ्या वाजवणाऱ्या खैरे यांना देखील चव्हाणांनी टाळ्या वाजवू दिल्या नाही. त्यांचा हात पकडून ठेवला.
यावेळी सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांनी निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, राष्ट्रवादीचे पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण, गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. इम्तियाज जलील कार्यक्रमाला हजेरी लावून परतले.
