परदेशात नको त्या उद्योगपतींना भेटतात, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याकडूनच राहुल गांधींची पोलखोल

नवी दिल्ली: उद्योगपती गौतम अडाणी यांच्यावरून राहुल गांधी अनेक नेत्यांवर आरोप करत असताना गांधी परिवाराशी अत्यंत चवळीत असलेल्या एका माजी काँग्रेस नेत्याने राहुल गांधींची पोलखोल केली आहे.परदेशात गेल्यावर राहुल गांधी नको त्या उद्योगपतींना भेटत असतात याची दहा उदाहरणे मी देऊ शकेल असा आरोप काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला आहे.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुलाम नबी आझाद यांच्यासह पाच माजी काँग्रेस नेत्यांचे उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी संबंध असल्याचे ट्विट केले होते. यावर उत्तर देताना आझाद म्हणाले,राहुल गांधी यांचे बोलणेच लज्जास्पद आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उद्योगपतींशी संबंध आहे. मी तुम्हाला दहा उदाहरणे देऊ शकतो की ते कुठे जायचे आणि कोणाला भेटायचे.


आझाद म्हणाले की, आपला कोणत्याही उद्योगपतींशी संबंध नाही, परंतु काँग्रेस परिवाराचे अनेक उद्योगपतींशी संबंध आहेत.
राहुल गांधी यांनी अदानी यांचे नाव पाच माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंधिया, किरण कुमार रेड्डी, हिमंता बिस्वा सरमा आणि अनिल अँटोनी यांच्यासोबत एका ग्राफिकमध्ये पोस्ट केले होते. अदानी समूहात या माजी काँग्रेस नेत्यांनी गुंतवणूक केली असावी, असे म्हटले होते. हिमंता बिस्वा सरमा यांनी या ट्विटबद्दल राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.