नवी दिल्ली : जागतिक नेत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता जगातील सर्वाधिक श्रीमंत आणि ट्विटरचे सीईओ इलोन मस्कही फॉलो करू लागले आहेत.
मस्क यांनी सोमवारपासून मोदी यांना फॉलो करण्यास सुरुवात केली. मस्क हे जगातील फक्त 194 लोकांना फॉलो करतात. त्यांचे ट्विटरवर
13.43 कोटी फॉलोवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 8.77 कोटी फॉलोवर आहेत.
मस्क हे जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपती आहेत. त्यांनी मायक्रो ब्लोगिंग साईट ट्विटर कंपनी विकत घेतली आहे. सध्या ट्विटरवर सर्वाधिक फॉलोवर्स मस्क यांचेच आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर फॉलो केलेल्या भारतीय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. मोदींच्या ट्विटर हँडलवर फॉलोअर्सची संख्या 8.77 कोटींहून अधिक आहे. नरेंद्र मोदी हे जगातील सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सक्रिय नेत्यांच्या यादीत सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. याआधी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अव्वल होते.
