गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अजित पवार हे महाविकास आघाडीवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. येत्या 15 दिवसांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात 2 मोठे बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. एका कार्यक्रमानिमित्त प्रकाश आंबेडकर पुण्यात आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
“आगामी 15 दिवसात महाराष्ट्रात तसेच देशात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने हे मोठे बॉम्बस्फोट असतील. नेमके काय घडेल हे मी आत्ताच सांगणार नाही, मात्र 15 दिवसानंतर आपण भेटू, तेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल.”
पुलवामा बाबत त्यावेळी ही मी बोललो होतो, जी गाडी ब्लास्ट केली. त्याला प्रोटेक्शन नव्हतं. ही माहिती मला मिळते तर सरकारलाही मिळू शकते. पण सरकारला राजकारण करायच होतं. दहा गाड्या कॅनॉव्ह बद्दलची साधी बाब कॉन्स्टेबलला माहिती आहे, ती बाब यांना माहिती नसावी. यांची साधी चौकशी सुद्धा नाही. पॉलिटिकल राजकारणासाठी या जवानांचा बळी दिलाय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
