चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुर; बंगळुरुच्या मैदानावर धोनी आणि कोहली आमने-सामने

आज आयपीएल 2023 मध्ये 24 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगणार आहे. आयपीएलमध्ये आज बंगळुरुच्या मैदानावर धोनी आणि कोहली आमने-सामने येणार आहे. या रोमांचक सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आयपीएल 2023 मध्ये दोन्ही संघांची एकसारखीच कामगिरी पाहायला मिळाली आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. आरसीबी आणि चेन्नई दोन्ही संघांनी चार पैकी दोन सामने जिंकले आहेत, तर दोन सामने गमावले आहेत. दोन्ही संघांकडे चार गुण आहेत. चेन्नई गुणतालिकेत सहाव्या तर बंगळुरु सातव्या क्रमांकावर आहे.

आयपीएलच्या इतिहास चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आतापर्यंत 30 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी चेन्नईने 19 सामने जिंकले. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुने 10 सामने जिंकले. या दोघांमधील गेल्या पाच सामन्यांपैकी धोनीच्या संघाने चार सामने जिंकले आहेत. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आजच्या या सामन्यावर कोणाची वरचढ ठरणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दोन्ही संघांचे संभाव्य खेळ-11
चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, अजिंक्य रहाणे, मोईन अली, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मगाला, एमएस धोनी (कर्णधार), तुषार देशपांडे, थिक्षाना, आकाश सिंग