राष्ट्रवादी फुटीच्या चर्चेला मी जबाबदार नाही. शरद पवारांची भूमिका आमच्यासाठी महत्त्वाची आहे. मी फक्त शरद पवारांच ऐकतो. अजित पवारांवरून भाजप बॅकफूटवर पडली. मी मविआचा चौकीदार आहे. सेनाफुटीनंतर तुम्हीही आमच्यावर बोललात. राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आम्ही उघडा केला. वकिलीचं खापर माझ्यावर का फोडता?
फोडण्याचं कारण काय शिवसेना फुटली तेव्हा तुम्हीदेखील वकिली करत होता. ते आमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की, आपल्या बरोबरचा घटक पक्ष मजबूत रहावा आणि त्याचे लचके तुटले जाऊ नयेत. ही जर आमची भूमिका असेल. त्यासाठी जर आमच्यावर कोणी खापर फोडणार असले तर ही गमंत आहे.
अजित पवारांनी तुम्हाला टार्गेट केलं यासंदर्भात विचारलं असता, मला कोणी टार्गेट केलं तर मागे जाणारा माणून नाही. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. मी नेहमी सत्य बोलतो. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर प्रेशर आहे असं संजय राऊत म्हणाले.
अजित पवार म्हणाले होते, आमच्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम काही विघ्नसंतोषी लोक करत असतील. माझ्या पक्षात माझ्याबद्दल आकस असणारं कुणी नाही. परंतु पक्षाबाहेरचे. तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्या पक्षांबद्दल सांगा. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत, असे अजित पवारांनी संजय राऊतांना फटकारले. यावर माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मी मविआचा चौैकीदार, मी भूमिका मांडणार. माझ्यावर खापर का फोडता? सेना फुटीनंतर तुम्हीही आमच्यावर बोललात.
त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठावूक? पक्षाची बैठक ज्यावेळी होईल, त्यावेळी मी विचारणार आहे”, असं म्हणत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे खासदार संजय राऊतांबद्दल संताप व्यक्त केला होता.
