शिवसेना व भाजपात दुरी निर्माण करण्याचे काम राष्ट्रवादीने केले-प्रवीण दरेकर

राज्यात 2019 च्या निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेवरून शिवसेना व भाजपात मतभेद झाले व त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. दरम्यान याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना व भाजपात दुरी निर्माण करण्याचे काम राष्ट्रवादीने केले. तसेच उद्धव ठाकरे यांना नाचवण्याचे काम राष्ट्रवादी करतेय अशा शब्दात दरेकरांनी शाब्दिक निशाणा साधला आहे.

शिवसेना व भाजपमधील वाढत अंतर हे शुभ संकेत हे राष्ट्रवादीला हवे होते. भाजपा व शिवसेनेमध्ये दुरावा ही तुमची आंतरिक इच्छा होती. भाजप वर्चस्वासाठी हे सगळं करत होते, असं चित्र तुम्हाला उभं करायचं होत. मात्र आता तुमच्या पोटातलं व मनातलं यानिमित्ताने समोर आलं आहे. आपला डाव हा राष्ट्रवादीच्या वर्चस्वासाठी आहे. आपला मुख्यमंत्री कसा होईल व शिवसेना व भाजपात दुरी कशी वाढेल यासाठी आपण प्रयत्नशील होता.

आज राष्ट्रवादीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. शिवसेना व भाजपात दुरी वाढली आहे. आज उद्धव ठाकरे यांना नाचवण्याचे काम राष्ट्रवादी करत आहे असा दावा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दरम्यान शिवसेना व भाजपातील वाढत्या दुरीला राष्ट्रवादी जबाबदार असल्याचा दावा दरेकर यांनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले होते तेव्हापासून ठाकरे गट व भाजपमधील अंतर दिवसेंदिवस वाढत गेले. भाषण, जाहीर सभा यांच्या माध्यमातून दोन्ही पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर निशाणा साधत आहे. दरम्यान आता दरेकर यांच्या दाव्यावर राष्ट्रवादीकडून काय प्रत्युत्तर येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.