टीम इंडियाया कॅप्टन रोहित शर्माचा आज वाढदिवस,जाणून घेऊयात त्याचा रंजक प्रवास…

टीम इंडियाया कॅप्टन रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. 30 एप्रिल 1987 ला त्याचा जन्म नागपूर येथे झाला होता. त्याचे वडिल ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करायचे. लहानपणी रोहितच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. पुढे त्याचे कुटूंब मुंबईला स्थायिक झाले त्यामुळे त्याचे शिक्षणही मुंबईत झाले. रोहितने फक्त 12 वी पर्यंत शिक्षण घेतले. त्याने त्याचे करिअर क्रिकेटमध्ये करण्याचं ठरवलं.

रोहितच्या वाढदिवशी मुंबई इंडियन्सचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर आला आणि चाहत्यांनी या व्हिडिओला अफलातून प्रतिसाद दिला आहे.

रोहित शर्मासाठी या वाढदिवशी मुंबई इंडियन्सचा सामना होणार आहे आणि तोदेखील त्यांच्या घरच्या मैदानात रंगणार आहे. त्यामुळे या वाढदिवशी रोहित शर्माला वाढदिलवसाचे गिफ्ट मुंबई इंडियन्स देणार का, याची उत्सुकता सर्वांना लागलेली असेल.

आता जाणून घेऊयात रोहितचा प्रवास…
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा क्रिकेट जगतात त्याच्या ओपनिंग आणि शानदार बॅटिंगसाठी जितका ओळखला जातो, तितकाच त्याच्या टोपणनासाठी देखील प्रसिद्ध आहे. फॅन्स आणि फॉलोअर्सपासून ते टीममेट्सपर्यंत त्याला याच नावाने संबोधतात. हे नाव ‘हिटमॅन’ आहे, जे फक्त टोपणनाव नाही तर त्याच्या संपूर्ण ओळखीचे वर्णन करते.

आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माच्या खेळाशी परिचित असलेल्यांना हे माहीत आहे की, मैदानात परिस्थिती कशीही असली तरी त्याला षटकार मारण्यासाठी फारशी धडपड करावी लागत नाही. विशेष म्हणजे, ज्या सहजतेने तो फटकेबाजी करतो, त्याने त्याला ‘हिटमॅन’ हे नाव मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

त्याला हे नाव 2013 मध्ये मिळाले. त्यानंतर त्याने बंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. रोहितच्या टोपणासंबंधी खुलासा करताना, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक रवी शास्त्री यांनी त्याला ही नवीन ओळख (हिटमॅन) मिळवून देण्यात कशी मदत केली ते सांगितले होते.

तसेच, रोहितला हिटमॅन म्हणण्यामागे आणखी एक स्टोरी आहे. त्याच्या नावाच्या शेवटी हिट (HIT) येते. हिंदीत “हिट” चा अर्थ मारणे असा होतो, रोहित मैदानावर तूफानी फटकेबाजी करतो… हिट (मारणे) आणि मॅन (व्यक्ती) यांना एकत्र करुन त्याला ‘हिटमॅन’ बनवले. तथापि, हिटमॅन हे प्रत्यक्षात एक व्हिडिओ गेम पात्र आहे, जो “एजंट 47” नावाचा क्लोन केलेला कॉन्ट्रॅक्ट किलर आहे, जो त्याला सापडलेल्या लक्ष्यांची हत्या करतो.

भारतीय क्रिकेट संघाचा हिटमॅन रोहित शर्मा आणि पत्नी रितिका सजदेह यांची आहे. रितिका सजदेह ही सिक्सर किंग युवराज सिंगची बहीण आहे. एका जाहिरातीच्या शूटींग दरम्यान युवराजनं रोहित शर्माला दमही दिला होता. मात्र एखाद्या फिल्मी स्टोरीसारखी दोघांची प्रेम कहाणी फुलली. एका रोमँटिक प्रपोजनंतर रोहित शर्मा आणि रितिका यांनी 3 मे 2015 रोजी साखरपुडा केला. त्यानंतर 13 डिसेंबर 2015 रोजी दोघं लग्नबंधनात अडकले. रोहित आणि रितिकाचं लग्न मोठ्या थाटामाटात ताज लँड हॉटेलमध्ये पार पडलं. या लग्न सोहळ्याला क्रिकेट आणि बॉलिवूडमधील सेलेब्रिटी सहभागी झाले होते.

2023 च्या ताज्या रिपोर्टनुसार रोहितकडे जवळपास 215 कोटींची संपत्ती आहे. 2017 मध्ये त्याच्याकडे 120 कोटींची संपत्ती होती जी प्रत्येक वर्षी 136, 142, 155, 170, 195 अशी वाढत गेली. आता हा आकडा 200 च्या पार गेलाय. सात वर्षात त्याची कमाई दुप्पट झाली आहे.