छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १ जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण केले गेले आहे.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती तसेच इतर लोकप्रतिनिधी व मान्यवर मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित आहेत.
यानिमित्ताने रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जात आहे. या विशेष दिवसाचे औचित्य साधत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी मराठीतून भाषणाला सुरूवात करत शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देत शिवाजी महाराजांच्या कार्याची उजळणी केली.ते म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या न्यायप्रियतेनं अनेक पिढ्यांना प्रेरित केलं आहे. त्यांचं साहस, सामुद्रिक कौशल्य आणि शांतीपूर्ण राजनिती आजही आपल्यासाठी प्रेरणास्रोत आहे. आपल्याला या गोष्टीचा गर्व आहे की जगाच्या अनेक देशात आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीची चर्चा होते आणि त्यावर संशोधन होतं ही बाब देशासाठी अतिशय अभिमानाची आहे.
शिवाजी महाराजांच्या न्यायप्रियतेनं अनेक पिढ्यांना प्रेरित केलं आहे. त्यांचं साहस, सामुद्रिक कौशल्य आणि शांतीपूर्ण राजनिती आजही आपल्यासाठी प्रेरणास्रोत आहे.आपल्याला या गोष्टीचा गर्व आहे की जगाच्या अनेक देशात आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीची चर्चा होते आणि त्यावर संशोधन होतं.एक महिन्यापूर्वीच मॉरिशसमध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली. त्यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षं पूर्ण होणं हीच एक प्रेरणादायी बाब आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
